Friday, 31 August 2018

वुई केअर सोशल फौंडेशन व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, मानसशास्त्र विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहाजी महाविद्यालय येथे करिअर मेळावा संपन्न


कोल्हापूर प्रतिनिधी दि : ३० ऑगस्ट २०१८ 


"प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या क्षमता ओळखून करिअर निवडले पाहिजे, तसेच प्रत्येकाची स्पर्धा दुसऱ्याशी नसून ती स्वताशीच असली पाहिजे तरच आपण या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो." असे मत महावीर महाविद्यालय मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्री. सुरेश संकपाळ यांनी व्यक्त केले. वुई केअर सोशल फौंडेशनने श्री शहाजी महाविद्यालय येथे संयोजन केलेल्या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्यातील करिअर मार्गदर्शनाचा व पोस्टर प्रदर्शनाचा १७० हुन अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला त्याशिवाय मेळाव्यातील सहभागी विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कल चाचणीद्वारे विश्लेषण करुन करिअरचे मार्गदर्शन झाले.


मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, "ससा आणि कासवाची गोष्ट जुनी झाली असून आजकालचे कासव हे स्केटिंग लावून पळतात त्यामुळे आपल्या कामात आपले सातत्य असले की आपण नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो." यावेळी शहाजी महाविद्यालयाचे मानसशास्त्र विभाग प्रमुख श्री. अनिल बलुगडे,  प्राध्यापक श्री. के. एम. देसाई, डॉ. एन. एस. जाधव तसेच फौंडेशनचे सुदर्शन पांढरे, इम्रान शेख, रूपेश कांबळे, सलमान मुजावर, फौंडेशनचे सदस्य व महावीर महाविद्यालयातील मानसशास्त्र शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment