हातकणंगले / प्रतिनिधी दि. ३/९/१८
सलीम खतीब
हेरले ( ता. हातकणंगले) येथील रविंद्र काटकर रिक्षाचालकाच्या घराची भिंत अतिवृष्टीने १६ जुलैच्या पहाटे पडून पत्नी अनिता काटकर मृत झाल्या. तर त्यांच्यासह मुलगा व मुलगी गंभीर जखमी झाले होते. ही आपत्ती घडून दोन महिने होत आहेत तरी शासन स्तरावर व लोकप्रतिनीधी यांच्या कडून कोणतीही मदत न झाल्याने काटकर कुटुंब उघड्यावर पडले आहे. रविंद्र काटकार पाठीच्या कण्याच्या आजाराने उपचारा अभावी झोपून असल्याने त्यांना महिन्यास उपचारासाठी दहा हजारावर खर्च आहे.कोणाला तरी प्रेमाचा उम्हाळा फुटेल का ?या कुटूंबास आर्थिक मदतीचा हात देईल का ?असा सवाल नागरिकातून उमटत आहे.
१६ जुलै च्या पहाटेअतिवृष्टीने घराची भिंत पडल्याने रविंद्र काटकर गंभीर जखमी झाले. तर अनिता पत्नी मृत झाल्या. अनिकेत व शिवानी हे दोघेही मुले जखमी झाली होती.ते उपचारानंतर बरे झाले. मात्र रविंद्र यांच्या पाठीस मोठी दुखापत झाल्याने त्यांना उठता बसता येत नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणेसाठी मोठा खर्च असल्याने शस्त्रक्रियाविना ते अंथरुणावर झोपून आहेत. त्यांना प्रती महिन्यास दहा हजार रुपये औषधोपचारास खर्च होत आहेत. त्यांचे बंधू अनिल काटकर हे रिक्षाचालकाचे काम करून बंधू व दोन पुतण्यांचा खर्च आपल्या कुटुंबासह पाहत आहेत. मात्र ते अशक्य होत आहे. काटकर कुटुंबाचे घर पडल्याने त्यांना भावाच्या छोट्या घरात वास्तव्य करावे लागत असल्याने ते बेघर झाले आहेत.
काटकर कुटुंब बेघर झाले आहे मात्र शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व इतर प्रतिष्ठीत मान्यवर आदींच्या विस्मरनाने त्यांना कोणाचीही आर्थिक मदत अथवा इतर मदत मिळाली नसल्याने संसार उघड्यावर आला आहे. प्रापंचिक साहित्य, कपडेलत्ता इतर जीवनोपयोगी सर्व साहित्याची नासधूस झाल्याने रोटी कपडा मकान सर्वच निसर्गाने हिसकाूवून घेतल्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कर्ता माणूस भिंत अंगावर पडल्याने गंभीर दुखापतीने झोपून व मुले शिक्षणात त्यामुळे आर्थिक स्त्रोत नसल्याने त्यांना जीवन व्यथीत करणे अवघड झाल्याने आर्थिक मदतीची गरज आहे.
खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, तरुण मंडळे , व्यापारी, व्यावसाईक, उदयोगपती आदींनी आर्थिक मदतीचे सहकार्य करावे. अनिकेत रविंद्र काटकर याच्या बॅक ऑफ इंडिया खाते क्रमांक 091010510001551या खात्यावर यथाशक्ती मदत करून त्यांच्या कुटुंबास आधार दयावा असे आवाहन अनिल काटकर यांनी केले आहे.
फोटो
हेरले येथील रविंद्र काटकर यांचे अतिवृष्टीने पडले घर
No comments:
Post a Comment