महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांच्याकडून शिक्षकांचे अभिनंदन ..
.आयुष्यभर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.
अशा गुणवंत गुरुवर्य शिक्षकांचा सत्कार हा झाला पाहिजे , महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ( कोल्हापूर जिल्हा ) या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेकडून कोल्हापूर जिल्यातील सातत्याने शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे त्याबरोबरच शिक्षकांचा सन्मान ही केला जातो .
यावर्षी श्री दिपक शेटे सर (यांना रोटरी क्लब व चाटे शिक्षण समुह कोल्हापूर यांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार , श्री प्रविण कांबळे सर ( मुख्याध्यापक ) यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार , श्री आर .एस .आळतेकर सर (मुख्याध्यापक ) आदर्श शिक्षक पुरस्कार , सौ . दिपाली बंडगर ( राजमाने ) मॅडम यांना श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान व जायंटस ग्रुफ ऑफ इंचलकरंजी यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला याबद्दल शिक्षक सेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले , यासाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हा कोषा अध्यक्ष श्री प्रमोद कांबळे सर , जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश लोहार सर , सरचिटणीस स्वप्नील पाटील सर , इंचलकरंजी शहर अध्यक्ष श्री गजानन लवटे सर , शहर उपाध्यक्ष श्री राहुल रजपुत सर , सचिव श्री सुनिल राजमाने सर , जिल्हा कमिटी सदस्य श्री चंद्रकांत कोळेकर सर हे उपस्थित होते यांनी कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेना यांचे वतीने अभिनंदन केले, या गौरव सोहळ्याला शहापुर पोलीस ठाणे चे पोलीस अधिकारी श्री रियाज मुजावर साहेब ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांनाही ही शुभेच्छा देण्यात आल्या ..
No comments:
Post a Comment