माजगांव प्रतिनिधी.—दि.११/०९/२०१८.
एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प,पन्हाळा याच्यामार्फत पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे"सकस आहार सप्ताह"अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेणेत आले.यामध्ये दि.०१/०९/२०१८ई रोजी गावातुन मुलांची प्रभात फेरी काढून गावामध्ये जनजागृती करणेत आली.दि.०२/०९/२०१८ई.रोजी परिसरातील सर्व अंगणवाडी मार्फत महिला सभा घेणेत आली.प्रमुख पाहुने गणपती मांडवकर यांनी महिलांनी सक्षम कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन केले.
आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तंदुरस्त राहावयाचे असेल तर आपला आहार सकस असणे महत्वाचे.उत्कृष्ट पोषण आहार स्पर्धा दि.०३/०९/२०१८ई.रोजी घेणेत आली.यामध्ये 'टी एच आर' पासून गरोदर स्तनदा माता(६महिने ते ३वर्षे) लाभार्थिंनी वेगवेगळे पदार्थ करुन आणले.
दि.०४/०९/२०१८ई रोजी प्रमुख पाहुण्या प्रज्ञा पाटील यांनी किशोर वयीन मुली भावी माता असलेने त्यांनी सकस आहार घेतलाच पाहिजे असे सांगितले.दि.०५/०९/२०१८रोजी सदृढ बाल स्पर्धा घेणेत आली.प्रमुख पाहुने सागर उबाळे यांनी सदृढ बालकाचे महत्व पटववून दिले.
दि.०६/०९/२०१८ई. रोजी पन्हाळा प्रकल्प अधिकारी पोमण्णावर मॅडम म्हणाल्या की,आईच्या दुधाची किंमत कोणत्याच'फार्म्युला'शी होवू शकत नाही.मातेच्या दुधामध्ये सर्व पोषण मुल्ये आणि बाहेरच्या संसर्गाच्या रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी 'अॅन्टीबाॅडीज'असतात.बाळ मानसिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मातेच्या दुधाला अनन्यसाधारण महत्व आहे.दळवी मॅडम यांनी वृध्दीआलेखावर मातांच्या समोर बालकांची वजने घेवून पडताळणी केली.
अशाप्रकारे दि.०७/०९/२०१८ई.रोजी पोर्ले/ठाणे चे सरपंच प्रकाश जाधव याच्या हस्ते बक्षिस वितरण करणेत आले.या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी विजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,मदतनीस व शालेय मुली उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment