Tuesday, 18 September 2018

मुर्तीदान उपक्रमास माजगांवमध्ये उत्तम प्रतिसाद.


       माजगांव प्रतिनिधी:—दि.१७/०९/२०१८.

        पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं छोटस टुमदार गाव माजगांव ता.पन्हाळा जि.कोल्हापूर या गावामध्ये पाच सहा वर्षापुर्वी कांही युवक एकत्र येवून गावामध्ये सकारात्मक उपक्रम राबवायचे ठरवतात.आणि त्यांची चळवळ सुरू होते.कोणताही गटतट न मानता कोणीही बोलावण्याची वाट न बघता एकत्र येवून विधायक काम सुरू करतात.

निसर्ग वाचवुया चळवळीअंतर्गत गेली ताच ते सहा वर्षे हा गट गावकर्‍यांचे समुपदेशन करुन गणेश मुर्ती दान करण्याचे फायदे तोटे समजावून सांगतो आणि गावकरीही त्यांना प्रतिसाद देतात.या वर्षीही असाच उपक्रम राबविण्यात आला. साधारण ९५% गावकर्‍यांनी गणेश मुर्ती कासारी नदीमध्ये विसर्जीत न करता पाण्यामध्ये बुडवून  युवकांच्याकडे दान केल्या.तसेच निर्माल्य दोन ट्राॅल्या जमा झाले.हे सर्व निर्माल्य बिलवर टेकडीवरील दगडांच्या खनीमध्ये विसर्जीत करण्यात आले.आणि पाण्याचे होणारे प्रदुषण टाळले.

     

   

        या उपक्रमामध्ये जीवन पाटील सर,संजय पाटील,प्रवीन चौगले,बाजीराव कदम,डाॅ.सतीश चौगले,बाबासो चौगले सर,शरद पाटील सर,कृष्णात कांबळे,जयदिप पाटील,बारक्या चौगले,अमोल चौगले,प्रथमेष पाटील,साळवी सर व गावातील सर्व युवक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment