हेरले / प्रतिनिधी दि. २६/९/१८
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन माध्यमिक शाळांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.
माध्यमिक शाळांच्या कडे प्राथमिक चे ही वर्ग असल्याने 14 व्या वित्त आयोगातून माध्यमिक शाळांना निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारा प्रमाणे माध्यमिक शिक्षकांना ही पुरस्कार देण्यात यावेत आणि माध्यमिक शाळांना ही ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने शाळांना विविध समस्यांना सामोरे लागत आहे याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
यावर बोलताना अमन मित्तल यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन माध्यमिक विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे तसेच शाळांची संख्या जास्त असल्याने समस्या उद्भवत असल्याचे मान्य करून याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले.
तसेच शिक्षकांना जिल्हा पुरस्काराबाबत आपण सकारात्मक असल्याचे सांगितले. माध्यमिक शाळांना सीएसआर फंडातून ई लर्निंग च्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य असल्याचेही सांगितले.14 वित्त आयोगाचे निधीबाबत त्याचा शासन निर्णय पाहून पाहून तशा सूचना संबंधित जातील असे सांगितले. मित्तल साहेब यांनी माध्यमिक विभागाच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण या मागण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
शिस्तमंडळाने या प्रश्नासंबंधी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अमरीश घाडगे यांचीही त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली त्यावर सभापतींनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले
या शिस्टमंडळामध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही जी पवार कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर एम पाटील संचालक बी बी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही जी पवार, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष के बी पवार, जी बी खांडेकर, प्रतापराव देशमुख, कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव चौगुले, मुख्याध्यापक संघाचे माजी सदस्य ए आर पाटील , संभाजीराव पाटील उपस्थित होते
फोटो
मुख्य कार्यकारी डॉ. अमन मित्तल यांच्या सोबत शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड व इतर पदाधिकारी.
No comments:
Post a Comment