माजगांव प्रतिनिधी:—दि.११/१०/२०१८.
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये समोर येणार्या ताणतणाव,अप्रसन्नता,नकारात्मक विचार,भिती,शारिरीक व मानसिक आजार इत्यादी पासून दुर राहण्यासाठी विश्वविख्यात आर्ट आॅफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रॅम माजगाव मध्ये दि.०२/१०/२०१८ते दि.०७/१०/२०१८ या कालावधीमध्ये टिचर प्रविन भैयांसोबत विठ्ठल विकास सोसायटी हाॅल माजगांव ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाला.
यामध्ये योग, प्राणायाम,ध्यान,तणावमुक्त जीवण जगण्याची सुत्रे व जीवनामध्ये येणार्या समस्यांना सामोरे जाण्याची कला इत्यादी बाबत सखोल मर्गदर्शन करण्यात आले,
सुदर्शन क्रीया ही फक्त आर्ट आॅफ लिविंगमध्येच शिकवली जाते.ही श्वसनाची अत्यंत प्रभावी लयबध्द प्रक्रिया आहे,याव्दारे अनेक साधकांना ब्लड प्रेशर,अस्थमा,डायबेटीस,हार्ट अटॅक,पॅरलिसिस,अॅसिडीटी,मायग्रेन,पाठ व सांधेदुखी यासारख्या असंख्य आजारातुन बरे होण्याची संधी उपलब्ध होते.
या शिबीरासाठी दिपक विचारे.(डी.ओ.)एल.आय.सी.व संदीप कुंभार.प्राथमिक शिक्षक.(जिल्हा परिषद)यांनी परीश्रम घेतले.
No comments:
Post a Comment