हातकणंगले / प्रतिनिधी
सलीम खतीब
कोल्हापूरचे पालक मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी मनपाडळे, कासारवाडी,लक्ष्मीवाडी,तारदाळ, माले या हातकणंगले तालुक्यातील गावांना भेटी देऊन दुष्काळ स्थितीची पाहणी केली.
माले (ता. हातकणंगले ) येथील दुष्काळ ग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली.यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले भुईमूग, सोयाबीन आदी पीके २५% खराब झाली आहेत. या बिकट स्थितीपेक्षा मार्च नंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही गरजेचे आहे. त्यासाठी उपाय योजनेसाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सर्वे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी सरपंच उमेश पाटील यांनी तलाव खुदाई व रुंदी करण्याची मागणी केली.तसेच माजी उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील यांनी नदीतून थेट पाईप लाईन करून गावाला पाण्याची व्ययवस्था करावी अशी मागणी केली.
यावेळी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी सभापती राजेश पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष पी डी पाटील, प्रताफ उर्फ बंटी पाटील, तहसिलदार सुधाकर भोसले,उपसरपंच सुनिल कांबळे,ग्रामपंचायात सदस्य , ,गटविकास अधिकारी, कृषी अधीकारी, मंडल अधिकारी,तलाठी, ,ग्रामसेवक ,शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो
माले( ता. हातकणंगले) येथे दुष्काळग्रस्त शेतीच्या परिस्थितीची पाहणी करतांना नाम. चंद्रकांतदादा पाटील , आम.डॉ. सुजित मिणचेकर व अधिकारी वर्ग
No comments:
Post a Comment