मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 ,कसबा बावडा मध्ये 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक मध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व पटवून सांगितले. मृणाली दाभाडे या विद्यार्थिनीने मतदान प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना सांगितली. मतदान अधिकारी अनिल पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिन व मतदान का करावे त्याचे महत्व सांगितले . सुजाता आवटी मॅडम यांनी मुलींनीसुद्धा आपल्या भागामध्ये आपल्या आई-वडिलांना पालकांना व मंडळांना मतदान दिनाचे महत्त्व समजून सांगावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मतदान अधिकारी संजय शेळके,बाळासो पाटील,श्रीमती ओंबासे मॅडम यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव शिवशंभू गाटे,जे बी सपाटे ,आसमा तांबोळी, तमेजा मुजावर, मंगल मोरे, हेमंतकुमार पाटोळे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार सहावी ची विद्यार्थिनी निशिका शिंदे यांनी मानले .प्रणव शिंदे ,यश घाडगे, दिशा कांबळे यांनी राष्ट्रीय मतदान च्या घोषणा दिल्या
No comments:
Post a Comment