प्राथमिक शिक्षण समिती, संचलित मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 ,कसबा बावडा मध्ये शिवजयंती उत्सव निमित्ताने भव्य निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरी करणेत आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश सुतार,यांनी केंदमुख्याध्यापक अजितकुमार पाटील,सुशील जाधव,दीपक उलपे यांचे उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेेस पुष्पहार घालून पूजन करणेत आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा दीपक उलपे तर अध्यक्ष रमेश सुतार हे होते.शाळेतील व उलपे क्लास मधील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत मोठया संख्येने सहभाग घेतला होता.
केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण व पर्यावरण यावर विचार प्रकट करतांना म्हणाले आधुनिक युगात वावरत असतांना प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याबद्दल काळजी वाटत आहे पण तो यावर उपाय किंवा खबरदारी घेतांना दिसून येत नाही यासाठी शिवरायांच्या काळातील शेती विषयक धोरण व पर्यावरण यांचा अभ्यास करून शेती करणे काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी एकच पीक न घेता विविध प्रकारची पिके घेतली जावी म्हणजे शेत जमिनीचे प्रदूषण होणार नाही.असे प्रतिपादन केले.
निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थी
*वक्तृत्व स्पर्धा लहान गट*
प्रथम क्रमांक -अवधूत शिंगे,द्वितीय क्रमांक-श्रेयागी पाटील,तृतीय क्रमांक- वेदिका पाटील
*वक्तृत्व स्पर्धा मोठा गट* प्रथम क्रमांक - वैष्णवी पोवार,द्वितीय क्रमांक-सानिका उलपे
*लहान गट निबंध स्पर्धा*
प्रथम क्रमांक- आशिषा गायकवाड,द्वितीय क्रमांक-अवधूत शिंगे,3 अमेय जाधव
*मोठा गट निबंध स्पर्धा*
1वैष्णवी पोवार, 2 पार्थ पाटील,3 भूमी चौगले यांनी क्रमांक मिळवले.परीक्षक म्हणून सुशील जाधव यांनी काम पाहिले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश सुतार यांचे केले.देशासाठी शिका व देशाचे नाव उज्वल करा.देशामध्ये आज विचार केला तर देशभक्ती,राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांची गरज आहे ते अशा राष्ट्रीय कार्यक्रम, सण,जयंती या कार्यक्रमाचे माध्यमातून प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त आहेत असा संदेश त्यांनी विजेत्यांना दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक उत्तम कुंभार, शिवशंभू गाटे,जे बी सपाटे ,आसमा तांबोळी,सुजाता आवटी,मृणाली दाभाडे, रसिका माळी, बापू गाढवे,अभिषेक बिरणगे,साईराज दाभाडे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमेजा मुजावर यांनी केले.
No comments:
Post a Comment