▼
Tuesday, 21 April 2020
दिंडोर्ले कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी - 200 कुटुंबांना किराणा वाटप
नंदगाव विजय हंचनाळे : भारत सरकारने संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉक डाऊन केल्यामुळे जवळपास सर्वच उद्योग धंदे ठप्प झाले आहेत. हातावर पोट असलेल्या लोकांचे हाताला रोजगार नाही , आणि जवळ पैसा नाही . मग अश्या लोकांचे पोटाचे हाल होत आहेत . या काळात अनेक सामाजीक संघटना पुढे येत आहेत . अशीच सामाजीक उत्तरदायित्वाची जबाबदारी शेतकरी पेट्रोलियम समाजिक फौंडेशन , व उद्योगपती श्री . बापुसो दिनकर दिंडोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप बापुसो दिंडोर्ले , विजय बापुसो दिंडोर्ले .रा .नंदगाव ( ता - करवीर ) मधील या युवकांनी जपली आहे .नंदगावमधील २०० कुटूंबांना एक महिन्याचा किराणा वाटप करण्यात आला . यामध्ये बावीस दैनंदिन जिवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे . यापुर्वी ही गावामध्ये ३ हजार मास्कचे वाटप दिंडोर्ले बंधूच्या वतीने करण्यात आले आहे . समाजसेवेचा वसा मनामध्ये ठेवून संकट काळामध्ये गरजूंना मदत करून प्रसिध्दीपासून लांब राहणाऱ्या या युवकांनी खरोखरच एक नवा आदर्शच समाजासमोर ठेवला . मजूर व गरजू लोकांना सुरक्षीत अंतर ठेवूनच घरी जावून वस्तूंचे वाटप केले . यावेळी अक्षय चव्हाण , संदिप पाटील , नितीश दिंडोर्ले , विकास दिंडोर्ले , सुभाष मोहीते , आकाश मोहीते रोहीत जगताप , सचिन दिंडोर्ले , सतिश दिंडोर्ले अभिजीत कोंडेकर यांचे सहकार्य लाभले . फोटो ओळ . गरीब व गरजू लोकांना ध्यान वाटप करताना उद्योगपती बापुसो दिंडोर्ले .व इतर .
No comments:
Post a Comment