कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता तो टाळण्यासाठी, व शासनाने केलेल्या जमावबंदी आदेशाचे पालन करत बसवेश्वर जयंती कमिटी च्या वतीने सांगण्यात आले की, या वर्षी अक्षयतृतीया रविवार २6एप्रिल २०२० रोजी आहे. प्रतिवर्षी ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिरात अक्षयतृतिया दिवशी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. जयंती निमित्त विविध कार्यक्रम भजन किर्तन प्रवचन आयोजित करण्यात येतात सकाळी जयंतीनिमित्त मोठय़ा प्रमाणात भावकी जमा होतात. व मोठ्या थाटामाटात बसव भक्तांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा होतो मात्र या वर्षी कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता घेत सोशल डिस्टंस पाळुन..
सर्व बसव भक्तांनी आपल्या घरी बसव जयंती आपल्या परीने साजरी करावी फोटो पुजन आपल्या घरी करावे व महात्मा बसवेश्वर यांचे चरित्र वाचन करावे व कोणीहि ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिराकडे येण्याचा प्रयत्न करु नये ,ग्रामपंचायत कोरोना प्रतिबंधात्मक सहनियंत्रण कमीटी तसेच पोलिसांना व प्रशासनाला सर्वांचे सहकार्य करावे तसेच आपली सुरक्षा आपल्या हातात आहे.कोणीही घराबाहेर पडू नये,घरात रहा सुरक्षित रहा.आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
व कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारच्या आवाहनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
अशी माहिती देणारे मॅसेज गावातील विविध सोशलमिडीया ग्रुपमध्ये पाठवून महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव कमिटी पट्टणकोडोली यांनी आवाहन केले आहे.