कडक कारवाई होणार - तहसीलदार व्यंकटेश मुंडे
उदगीर प्रतिनिधी:-गणेश मुंडे
उदगीर शहरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर देखील नागरिकांनी म्हणावे ते गांभीर्य अजूनही बाळगलेले दिसून येत नाही. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी विनंती करून देखील अनेक युवक रस्त्यावर दुचाकी, चारचाकीतून फेरफटका मारताना दिसून येत आहेत.शहराबरोबर ग्रामीण भागात ही सर्रासपणे पहायला मिळत आहे.उदगीर शहारत चौबारा, किल्ला गल्ली, खडकाळी, डबीपुरा हा भाग पूर्णपणे सील केला आहे. या भागावर प्रशासनाचे लक्ष आहे. उदगीरकरांच्या ध्यानीमनी नसताना, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. उदगीर शहर आणि ग्रामीण भागात जिल्हा बंदी असतानाही नागरिक आलेच कसे ? हा गंभीर प्रश्न प्रशासनाला भेडसावतो आहे. उदगीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ हे सतत प्रयत्नशील असताना देखील लपून छपून आलेल्या या नागरीकामुंळे ग्रीन झोन मध्ये जात असलेला लातूर जिल्ह्याला पून्हा आहे तेथेच राहावे लागत आहे. वास्तविक पाहता ही गोष्ट नागरिकांनी कोरोणाच्या संदर्भात गांभीर्य न घेतल्यामुळे किंवा आपण परराज्यातून आलेल्या हे लोकांना कळाल्यानंतर आपल्याला वेगळे ठेवले जाईल. या भीतीपोटी ही गोष्ट लपवून ठेवली असावी, ही गोष्ट समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. त्यामुळे अशा पद्धतीची चूक करून समाजाचे आणि देशाचे नुकसान टाळावे. असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. उदगीर शहरातल्या त्या रेडझोनला पूर्णपणे तील करून याठिकाणी औषधाची फवारणी नगरपालिकेच्या वतीने केली जाते आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि येणाऱ्या सात दिवसात घराबाहेर पडू नये आपली व आपल्या परिवारांची पण काळजी घ्यावी असे आवाहन उदगीर तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, यांनी केले आहेत
No comments:
Post a Comment