▼
Saturday, 25 April 2020
दारू दुकानासमोरील चौकोनी पट्टे सोशल मिडियावर व्हायरल
कोल्हापूर प्रतिनिधी आज सकाळी दिल्लीमध्ये किरकोळ दुकाने उघड - बंद चा जो घोळ झाला त्याचाच काहीसा परिणाम संपूर्ण देशात आणि कोल्हापूरातही पहायला मिळाला. देशभर मॉल वगळता इतर दुकानांना काही अटींवर परवानगी दिली आहे अशा बातम्या पाहून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कोल्हापूरात तर दारु दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगसाठी पट्टा मारलेल्या जागेंचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. पण अधिकृत माहिती नुसार अशा प्रकारे दारु दुकाने, सलून किंवा उपहारगृहांना सुरू करण्याची कोणतीही परवानगी देण्यात आली नाही तर लॉकडाऊन काळात केंद्र सरकारने यावर पुर्ण बंदी घातली आहे. आणि महानगरपालिका कर्मचार्यांनी याची दखल घेऊन असे चौकोनी पट्टे पुसण्याला सांंगितले. यामुळे तळीरामांची पुन्हा निराशा झाली आहे.
Hii
ReplyDelete