Thursday, 23 April 2020

उदगीर तालुक्यात लग्नसराईचा हंगाम बुडाल्याने आर्थिक पेच ! लॉकडाऊनचा फटका


लॉकडाऊनचा परिणाम : व्यावसायिक सापडले संकटात ; लाखोंची उलाढाल झाली ठप्प ; लघु व्यावसायिकांना मदतीची अपेक्षा 

अॅड अमोल कळसे 

उदगीर : मागील दोन महिन्यापासुन  सर्व व्यवहार बंद असल्याने नियोजित विवाह सोहळे पुढे ढकलले जात आहेत . परिणामी लग्नसराईचा हंगाम वाया जात असल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे . 
आचाऱ्यापासून ते बँडपार्टीपर्यंत सर्वच घटकांना या बंदीचा फटका बसत आहे . जानेवारी महिना संपताच लग्न  सराईला सुरुवात होते . विशेष म्हणजे प्रामीण भागात या काळात प्रत्येक गावामध्ये किमान १० ते जास्तीत जास्त २५ विवाह सोहळे दरवर्षी पार पडतात , यातून बाजारपेठेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते . 
शेकडो कामगारांना आणि गाव पातळीवर असलेल्या बलुतेदारांना रोजगार उपलब्ध होतो . लग्नाचा जास्त सोन्या चांदीच्या खरेदीतून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते . त्याचबरोबर मंगल कार्यालये , आचारी , भटजी , किराणा , केटर्स , डेकोरेशन , फुलांचीसजावट आणि थंड पार्टी अशी व्यावसायिकांची मोठी साखळीच या लग्न  सराईवर अवलंबून असते . मात्र  कोरोनाच्या धास्तीमुळे संपूर्ण देशभरातच लॉकडाऊन झाले आहे . परिणामी सर्व व्यवहार बंद असून , या नाव्ही , कपडी धुणारी , वाजंत्री या बलुतेदार मंडळीनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे .

अलीकडच्या काळात फोटोग्राफीलाही महत्व प्राप्त झाले आहे . लग्नसराईत व्हिडीओ शुटींग , फोटोग्राफी करणाऱ्यांचेही व्यवसाय ठप्प झाले आहेत . मार्च , एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात विवाह मुहूर्त आहेत . मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना हे विवाह सोहळे लांबणीवर टाकावे लागत आहेत , तर काहींनी घरच्या घरी हे सोहळे उरकण्याचा निर्णय घेतला . त्यातूनही व्यावसायिकांना फटकाच सहन करावा लागत आहे .



शेकडो वाहने जागेवरच
लग्न सोहळ्यासाठी चारचाकी वाहनांचाही मोठ्या . प्रमाणात वापर होतो . मात्र ही वाहनेही सध्या एकाच जागी धूळखात उभी आहेत . ऐन लमसराईच्या सिझनमध्ये या वाहनांना भाडे मिळत नसल्याने वाहनमालक अडवणीत सापडले आहेत . त्यापेक्षाही या वाहनांवर चालक म्हणून काम करणाऱ्या नागरिकांची मोठी गोची झाली आहे .

लग्नसराईत मिळालेल्या नफ्यातून चालक , मालकांना चांगली कमाई होते ; परंतु , व्यावसाय ठप्प असल्याने अनेक चालकांना पगारही मिळाला नाही . तेव्हा किमान चालकांना पगार तरी वितरित करावा , अशी अपेक्षा वाहन चालक बोलून दाखवित आहेत .

 •

No comments:

Post a Comment