Wednesday, 29 April 2020

आ.डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार जिल्ह्यातील बाहेरगावी असलेल्या जनतेला जाहीर आवाहन

आ.डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार जिल्ह्यातील बाहेरगावी असलेल्या जनतेला जाहीर आवाहन
नंदुरबार - नंदुरबार  लोकसभा मतदार संघातील कोरोना विषाणू उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणी रोजगार, शिक्षण,   वैद्यकीय व इतर कामासाठी गेलेले बांधव लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्यात व इतर राज्यात अडकून पडलेले आहेत. या सर्व मजूर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्या बांधवांना राज्यात आणण्याची आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी विनंती केली आहे. अशा सर्व मजूर, विद्यार्थी, आरोग्य व इतर कामासाठी गेलेल्यांनी आपले नाव, ते कुठे आहेत त्या गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव तसेच शक्य असल्यास स्वतःचा भ्रमणध्वनी (मोबाईलवर) क्रमांक द्यावा. यातून त्यांना नंदुरबार जिल्ह्यात कोणत्या गावी यायचे आहे, त्या गावांच्या नावांची यादी तयार करून नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर विनाविलंब पाठवावी. म्हणजे मजुर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्यांना त्यांच्या गावाला आणण्याची व्यवस्था करता येईल. यासंदर्भात आ.डॉ.विजयकुमार गावित यांचे मुख्यमंत्री कार्यालयाशी व सचिव (मंत्रालय) यांच्याशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी याबाबत वरीलप्रमाणे सूचित केले आहे. कृपया याकामी कार्यकर्त्यांनीही संबंधित राज्यात किंवा जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, वैद्यकीय व इतर कामांसाठी गेलेल्यांशी संपर्क साधावा आणि याबाबतची संपूर्ण कार्यवाही करावी, असे आवाहन आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी केले आहे.

           संपर्कासाठी
शरद राठोड (मो.8888565817)
Email- rathod.sharad@gmail.com

अशोक बेहेरे (9049960397)
Email-
drashokbehere@gmail.com

No comments:

Post a Comment