Tuesday, 21 April 2020

लॉकडाऊनचा फटका पिग्मी एजंटना - परिस्थिती बिकट

कोल्हापूर प्रतिनिधी - सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पिग्मी एजंटांनाही त्याचा  फटका बसताना दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये पतसंस्था आणि बँकिंग क्षेत्रांतील उलाढाल पुर्ण मंदावली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या पिग्मी एजंटांना त्याचा मोठा दणका बसला आहे. सरासरी दररोज दहा हजार पिग्मी गोळा करणाऱ्या एजंटांचे आज कलेक्शन 400 ते 500 रुपये पर्यंत आले आहे. लॉकडाऊन नंतर तातडीने परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याने याचा फटका एजंटांना बसणार आहे.  याबाबत पिग्मी एजंट तानाजी रणदिवे यांनी सांगितले की आमच्या क्षेत्रात बरेच पिग्मी एजंट हे हातावरचे पोट असणार आहेत. आम्हाला फिक्स पगार नसतो तर कलेक्शन रकमेवर कमिशन मिळते. लॉकडाऊन काळात कलेक्शन दुकाने बंद असल्याने पिग्मी बचत कलेक्शन ठप्प झाले आहे. त्यामुळे परिस्थिती बििकट झाली आहे. 

No comments:

Post a Comment