सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अपंग निराधार विधवा कुटुंबांना एक महिन्याचा किराणा वाटप
कारंजा प्रतिनिधि m.आरिफ पोपटे = युवा रुरल असोसिएशन नागपूर या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत कोरोना विषाणूजन्य आजारात लोक डाऊन मुळे निराधार , अपंग, भूमिहीन यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या काळात संस्थेच्या वतीने कारंजा भागातील 27 गावांमध्ये 300 गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे किराणा किट चे वाटप करण्यात आले आहे. याअंतर्गत कारंजा लाड तालुक्यातील 300 गरजू कुटुंबांना राशन किट चे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये कुपट्टी ते शेमलाई रोड कामावरील छत्तीसगड येथील 56 मजूर तसेच लाडेगाव ते पिंपरी रोड वरील आयुर्वेदिक औषधी विकणारे 41 मजूर याचा समावेश आहे.
गरजूंना किट वाटप करतेवेळी सरकारी नियमांचे व सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्स इन ठेवून तसेच सर्वांनी तोंडाला मास लावून शांततेत नियमाचा भंग न होता वाटप करण्यात आले.
युवा रुरल असोसिएशन नागपूर या सामाजिक संस्थेअंतर्गत कारंजा तालुक्यातील वॉश प्रकल्पांतर्गत 20गावामध्ये कार्य सुरू आहे. (Wash) प्रकल्पांतर्गत जी.प. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता शौचालयाची निर्मिती करणे तसेच गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे .
आज संपूर्ण जगात कोरोणा विषाणूचा पसार झाल्याचा दिसून येत आहे या काळात गोरगरीब, विधवा ,अपंग ,भूमिहीन ,निराधार यांना दोन टाइमचे जेवण मिळणे कठीण झाले आहे ही बाब संस्थेच्या लक्षात येताच संस्थेने कारंजा तालुक्यातील 27 गावांमध्ये 300 गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे किराणा वाटप करण्यात आला आहे.
वाटप करण्याकरिता माननीय तहसीलदार मांजरे साहेब यांची मोठ्या प्रमाणात मदत झाली. त्यांनी ठोक दरात किराणा उपलब्ध करून दिला, तसेच त्यांनी बजरंग दल याचे स्वयंसेवक देऊन सर्व किट तयार करून दिल्या तसेच महेश भवन चा हॉल या कामाकरिता दिला. व 27 गावांमध्ये किट वाटप करण्याकरिता त्यांनी मालवाहू गाडी दोन दिवस निशुल्क उपलब्ध करून दिली.तसेच संस्थेच्या कार्यकर्त्यांना फिरण्या करिता आय काड सुद्धा तहसील कार्यालयामार्फत देण्यात आले.
सर्व प्रक्रिया पार पाडण्याकरिता जि . प. सदस्य चंद्रशेखर डोईफोडे तसेच युवा रुरल असोसिएशन या संस्थेचे कार्यकरते सचिन सिदगुर, राहुल लव्हाळे व सीमा ऊईके व वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बूराण उद्दीन बोरा यांनी परिश्रम घेतले.