कंदलगावात पुन्हा होणार लॉक डाऊन . जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने हालचाली सुरू ...
जिल्हा प्रशासनाकडून वारंवार कल्पना देऊनही रस्त्यावरची गर्दी कमी होत नसल्याने रिकाम टेकड्यांच्या येरजाऱ्या सुरुच आहेत . यामुळे कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत आहे .
भाजीमंडई , मुख्य रस्ते , . चौक तसेच ग्रामिण भागातील ठिकाणे अजूनही गर्दीने फुलली आहेत . कोरोना थांबवायचा असेल तर स्वतःला गर्दीपासून वाचविणे गरजेचे असून देखील किरकोळ अथवा काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या रिकाम टेकड्यांनमुळे प्रशासन हतबल झाले आहे .
आशा वेळी प्रत्येक दहा -बारा दिवसांनी संचारबंदीचा कालावधी वाढविल्या शिवाय प्रशासना पुढे पर्याय नाही . घरात बसून कंटाळा आला मग कुणा कडून तरी पेट्रोल मागून घेऊन घरातील औषध व किरकोळ सामानाची चिठ्ठी घेऊन फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे .
यामुळे लॉक डाऊन वाढविणे याशिवाय पर्याय नाही . मात्र या सर्व कारणाने स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढत असून यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन हतबल होत आहे . या संचारबंदीत गावातील विरोध मावळला असला तरी घरच्या कामामुळे लॉक डाऊन करणेसाठी पूर्णवेळ कोण देणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे .
जिल्हा प्रशासनाच्या आदेशा नुसार आजपासून पुन्हा गावच्या सिमा लॉक डाऊन करणेचा निर्णय आज झालेल्या ग्रामपंचायत बैठकित झाला आहे .
" प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे . मात्र गावपातळीवर सर्वजण एकमेकांच्या ओळखीचे असल्याने अडवणार कोणाला ? एखाद्याने घरचे काम सांगीतले तर त्याला गावाबाहेर सोडावे लागते . त्याला आडविले तर गावभर चर्चा होते . आशा वेळी प्रशासकीय यंत्रणेचे कर्मचारी गाव सिमेवर द्यावेत .
सचिन संकपाळ , अध्यक्ष , समाजवेध दक्षता समिती .कंदलगाव