नंदगाव - विजय हंचनाळे - दि :२१/०४/२०२०
कोरोना पार्श्वभूमीवर गेला महिनाभर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेविका,आशा,अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. देशभर सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. परिस्थिती नियंत्रणात राहण्यामागे या सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्येक घरी जावुन त्यांनी सर्वे व वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करीत आहेत. तसेच यासोबतच पोलिस कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन खुप मेहनत घेतली आहे.
अशा सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पुष्पवृष्टी करीत टाळ्यांच्या गजरात क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे संस्था व अनंतशांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी सुभाष पाटील, सरपंच संध्या पाटील, माजी उपसरपंच पांडुरंग खेडकर, सदस्य सुरेश पाटील, ग्रामसेवक पुनम कांबळे, परिचारिका आफळे व संस्थेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गिरगावचे विद्यमान उपसरपंच कोण आहेत याची माहिती घेवून कृपया बातमी प्रसिद्ध करावी
ReplyDelete