Thursday, 23 April 2020

अन्नसुरक्षा योजना कार्डधारक व अंत्योदय योजना मधून जिल्हा परिषद अध्यक्ष मा. राहुल केंद्रे यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप



अॅड अमोल कळसे

उदगीर  : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब याच्या संकल्पनेतून
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजना कार्ड धारक  तसेच अंत्योदय कार्ड लाभार्थी धारकांना स्वस्त धान्य दुकान यामार्फत मिळणाऱ्या मोफत  धान्य  वाटप योजनेची मा.पालकमंत्री संभाजी भैय्या पाटील व जिल्हा अध्यक्ष रमेश आप्पा कराड  यांच्या सूचनेवरून  रविदास नगर, आनंद नगर, तिरुपती सोसायटी, शिवाजी सोसायटी,  संतोषीमातानगर हनुमान नगर, अंबिका मंदिर परिसर, कृष्णा नगर,  गणेश नगरमध्ये  जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांच्या हस्ते गरजू  लोकांना  धान्य  वाटप  करण्यात  आले.  यावेळी लाभार्थ्यांना प्रत्येकी  5 किलो मोफत तांदूळ  वाटप   करण्यात  आले.  यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती ज्योतीताई राठोड, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चे  लातूर जिल्हा अध्यक्ष  बापुराव राठोड, पंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील,प्रभाग 19 चे  भाजपचे नगरसेवक गणेश गायकवाड, सरपंच   वसंतराव  जाधव, सागर  बिरादार  आदी उपस्थित  होते

No comments:

Post a Comment