============
अॅड अमोल कळसे
उदगीर तालुक्यातील लोणी येथे सध्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या लॉकडॉऊनच्या पार्श्वभुमीवर आज लोणी येथील सामाजिक कार्यकर्ता साधू लोणीकर यानी साधू लोणीकर मिञमंडळाच्या वतीन लोणी येथिल अनेक जनाचे हातावरचे पोट असल्याने सध्या कोराना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हनून सरकारने गेल्या एक महिन्यापासुन लाॅक डाऊन व संचार बंदी असल्यामूळे मजुरी करुन आपल पोट कूटूंब भागवणार्या दोनशे कूटूंबाला राशन किट देण्यात आले यात पाच कीलो ज्वारी, एक कीलो साखर, एक कीलो दाळ, एक कीलो मीठ, एक कीलो तेल ,साबन निरमा आदिचा समावेश आहे. आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाच आपण काहितरी देण लागतो अशी सामाजीक बांधिलकी जपत लोणी येथिल साधू कांबळे लोणीकर हे स्वतः सुशिक्षीत बेरोजगार असुन सूध्दा स्वकमाईतून या युवकाने गरीबांना राशन कीट मदत केली.
यावेळी साधु लोणीकर मित्रमंडळाचे साधु कांबळे लोणीकर, गोविंद घुगे, मिलन पटवारी, दत्ता गायकवाड, रोहीत लोणीकर,पांडुरंग पाटील, विकास कांबळे, गोंडराज सुर्यवंशी, शुभम वाघमारे, गणेश गुलफुरेव मित्रमंडळ उपस्थित होते.