Saturday, 25 April 2020

लॉकडाऊनमध्ये कॉमन मॅन संघटनेचा नागरिकांना दिलासा - स्वस्तात कांदा बटाटा विक्री

कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूरात सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि भाजी विक्रेते मात्र  लॉकडाऊन चा फायदा घेत भरमसाट दराने विक्री करत आहेत ,ज्यामुळे जीवनावश्क वस्तू व पदार्थ यांचे भाव गगनाला भिडले .या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्किलीचे व असह्य  झाली आहेत .एकीकडे काम नाही त्यामुळे कमाई नाही आणि या परिस्थितीमध्ये  चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्या लागत आहेत .ही बाब लक्षात घेऊन कॉमन मॅन व युवक मित्र यांनी दर रविवारी राजारामपुरी अकरावी गल्ली येथे मारुती देवळासमोर कांदा बटाटा लसून यांचा स्वस्त दराचा स्टॉल लावला आहे .या ठिकाणी एक नंबर ठेवणीचा कांदा पंचवीस रुपयांत दोन किलो ,उत्कृष्ट इंदोरी बटाटा पस्तीस रुपयांत दोन किलो व उत्कृष्ट मध्यप्रदेशचा मोठा लसूण शंभर रुपयांत एक किलो ,सकाळी साडे आठ ते बारा वाजेपर्यंत मिळणार आहे .मात्र मास्क घालून, पिशवी घेऊन  व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच खरेदीला या असे आवाहन कॉमन मॅन चे बाबा इंदुलकर यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment