Sunday, 26 April 2020

इफेक्ट बातमीचा - मोरेवाडीची पाणी गळती पासून सुटका , नवीन पाईप टाकणेचे काम सुरू ...

कंदलगाव - प्रकाश पाटील
     महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गांधीनगर प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या मोरेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैभव सोसायटी ते शांतीनिकेतन परिसरातील जुन्या पाईपला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळे परिसरात कमी दाबाने व अवेळी पाणी पुरवठा होत होता .
     वारंवार मागणी करूनही संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत होते . पोर्टल माध्यमातून सांगली , पुणे , मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयांशी पाठपुरावा झाल्याने या जलवाहिनीने काम सुरू झाले .
      २५० मी .मी . व्यासाच्या या जलवाहिनी खुदाईचे काम काल दि .२६ रोजी सुरु झाले असून येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल . त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल .
 वृत्तपत्र व  MH9 LIVE NEWS पोर्टल माध्यमातून नियोजन करून पत्रव्यवहार व वरिष्ठांशी संपर्क केल्याने नविन पाईप टाकण्याचे काम सुरू झाले . पुढील काळात स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होईल . नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे .
दत्तात्रय भिलुगडे , अमर मोरे
ग्रा .पं. सदस्य , मोरेवाडी .
फोटो  - मोरेवाडी शांतीनिकेतन परिसरात नविन पाईपचे टाकणेसाठी खुदाई काम सुरु झाले .
( छायाचित्र . प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment