प्रतिनिधी एस एम वाघमोडे
कोरोना विषाणूच्या उच्चाटनासाठी देशभर लढा सुरू असून सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला मोठा ताण पडत आहे. म्हणून करवीर शिवसेना पोलीस मित्र बनून पोलीस प्रशासनाला हातभार लावणार आहे. तसे निवेदन तालुकाप्रमुख प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले.
देशात व राज्यात कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला परतवून लावण्यासाठी सर्व यंत्रणा कर्तव्य निभावत आहे. नागरिकांनी घरी राहावे म्हणून पोलिस यंत्रणा 24 तास रस्त्यावर उतरून जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहे. पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. तो कमी करण्यासाठी करवीर पूर्व भागात शिवसैनिक पोलीस मित्र बनून पोलिस यंत्रणेला मदत करणार आहेत. गावागावातील शाखेद्वारे पोलीस खात्यास मदत करण्यासाठी शिवसैनिक तत्पर आहेत. संबंधित सेवा बजावताना नियम व अटी पाळल्या जातील. ही सेवा विनामूल्य दिली जाणार असल्याचेही राजू यादव यांनी भांडवलकर यांना सांगितले.
या शिष्टमंडळामध्ये राजू यादव यांच्यासह उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, दीपक पाटील, प्रफुल्ल घोरपडे, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, किरण शिंगे, संभाजी वाईंगडे, राजेंद्र राठोड यांचा समावेश होता.
1 comments:
Write commentsअभिनंदन साहेब! जय महाराष्ट्र!
Reply