विजेचा वापर तर चालूच आहे,
मग अद्याप पर्यंत वीज बिल का आले नाही ?
असा प्रश्न बऱ्याच ग्राहकांच्या मनात हा प्रश्न आहे. याविषयी कोल्हापूर महाविरणचे अभियंता शेळके यांनी सांगितले की,
महावितरण तर्फे ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा राहील याची परिपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. महावितरणचे कर्मचारी करोनासारख्या महामारीत देखील आपण घरात रहावे म्हणून कर्तव्यावर आहेत..
लॉक डॉऊन असल्याने ग्राहकांच्या घरी मिटरचे रिडींग घेण्यासाठी महावितरणकडून मिटर रीडरला पाठविण्यात आलेले नाही व त्याच प्रमाणे बिल वाटप करायला सुद्धा कुणी येणार नाही..
मग वीज बिल मिळणार कसे ?
यावेळी महावितरणने आपल्या ग्राहकांना महावितरण मोबाईल अँप व्दारे घरबसल्या रिडींग सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
ज्यांनी रिडींग सबमिट केले त्यांना रिडींगनुसार तर इतरांचे सरासरी युनिटने वीज देयक तयार होईल.
आपले वीज देयक आपण महावितरण मोबाईल अँप मध्ये बघू शकतो तसेच भरू शकतो किंवा खाली दिलेल्या लिंकवर ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकून सुद्धा आपल्याला बिल घेता येईल आणि रक्कम अदा करता येईल..
(टीप-कुणालाही यावेळी घरपोच बिल मिळणार नाही..)
जर अद्याप आपण महावितरण मोबाईल अँप डाऊनलोड केले नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करावे.