लॉकडाऊनमुळे घरीच विवाह पार पडला.मोजके पाहुणे उपस्थित,ना सनई ना बेंडबाज्या
उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे
- वधु वर , आई - वडिल व पुरोहित उपस्थित-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाकडाऊनमुळे तसेच संचारबंदी असल्यामुळे उदगीर तालुक्यातील. गुडसूर येथील हमालपुरे व वाघमारे कुटुबीयांकडून पंधरा जणांच्या उपस्थित वराच्या घरी विवाह पार पडला.कोरोना व्हायरसमुळे अंतर्गत संचारबंदी सुरू असल्यामुळे सर्व व्यवहार बंद आहेत.वाहतुकी बंद आहेत सध्या केवळ जीवनावश्यक वस्तुची वाहतूक सुरू आहे. आध्यापही बस,रेल्वे, खाजगी वहाणे बंद आहे तसेच दुकाने उघडण्यास कांही अटीवर परवानगी देण्यात आली आहे .धार्मिक,लग्न सोहळ्यावर बंदी आहे.यामुळे अनेक विवाह सोहळे थांबले आहेत.यामुळे वधुवरास त्यांचे वडीलही चितेंत आहे. परंतु पहिले लॉकडाऊन हे १४ एप्रिल रोजी संपणार होते.परंतु परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यामुळे धुमधडाक्यात लग्न करण्याची आशा अनेकांची मावळली आहे.तरीही अशा परिस्थितीतही संचार बंदीचे नियम पाळून काही जण विवाह करीत आहेत. असाच विवाह गुडसूर येथील हमालपुरे व वाघमारे येथील कुटुंबीयाकडून विवाह पार पडला . या विवाह सोहळ्यास केवळ दहा ते बारा
जण उपस्थित होते.मुलीचे आई- वडिल,मामी आणि नवरदेवाकडील आई,आजी,चुलता,चुलती आत्या- मामा आणि उपसरपंच अॅड. अनिल लांजे उपस्थित होते.
परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला
लग्न ठरून पाच महिन झाले होते. तसेच लग्नाची तारीखही काढली होती. परंतु ,कोरोनामुळे मोठे लग्न करणे शक्य नव्हते.लग्न मोठे करायचे होते.परंतु मुंबई ,पुणे,हैदराबाद येथून नातेवाईक येथे येणे शक्य नव्हते .. त्यामुळे मी व उपस्थित सर्व ठरलेल्या तारखेस घरीच देवापुढे विवाह पार पडला.
नवरदेव, पत्रकार बालाजी हमलापुरे.