Monday, 27 April 2020

एकूर्गा (रोड) येथील तीन नागरिकावर गुन्हा दाखल.

एकूर्गा (रोड) येथील तीन नागरिकावर गुन्हा दाखल.
उदगीर प्रतिनिधी :- गणेश मुंडे 
कोरोना संदर्भाने जिल्हाबंदी असताना जिल्हात प्रवेश केला म्हणून वाढवना पोलीस ठाण्यात  गुन्हा  दाखल झाला आहे  उदगीर तालुक्यातील एकूर्का रोड येथील तीन नागरीक झुप्या रस्त्यानी  लोक चोरून लपून विना पास परवाना ठाणे येथून उदगीर तालुक्यातील एकुर्का येथे  आले आहेत.अशी वाढवणा  पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली असता वाढवना पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांनी लागलीच एक पथक एकुर्का गावी पाठवून देऊन खात्री केली.  एकूर्का येथील तीन इसम आपले स्वतः चे टेम्पो ने ठाणे ते एकूर्गा असे विना परवाना प्रवास करून कोरोना चे प्रादुर्भाव होऊन समाजाचे आरोग्यास अपाय होईल असे माहीत असताना सुद्धा अशी हयगयीची कृृृत  केल्याचे निष्पन्न झालेने, पोलीस उपनिरीक्षक संदीप जौंधळे यांचे फिर्याद वरून वाढवना पोलीस स्टेशन मध्ये या तिघा विरुध्द भा.दं.वि. 188,269,270 कलमासह साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम 2,3,4प्रमाणे  गुन्हा दाखल करणेत आला आहे.

No comments:

Post a Comment