*मंगरुलपीर :(m आरिफ पोपटे ) नगराध्यक्षा डॉक्टर गझाला खान ,एसडीओ श्री देशपांडे,गटनेते श्री चंदुभाऊ परलीकर यांचे हस्ते मंगरुळपिर नगर परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत "कोरोना लॉक"हे अभियान दि.27 एप्रिल 2020 रोजी राबविण्यात आले.मंगरुळपिर शहरातून रॅली काढण्यात येऊन सदर अभियानाचे नागरिकांनी कौतुक केले.नगरसेवकांनी ठीकठिकानी आरोग्य निरीक्षक श्री राजू संगत आणि त्यांचे टीमचे स्वागत केले.नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात साफसफाई,जंतुनाशक फवारणी, सॅनिटाइझेशन,नागरिकांचे आरोग्याचे दृष्टिकोनातून चोखपणे केल्या जात आहे.नागरिकांकडून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व शासनाचे सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ते सर्वांच्या भल्याचे आहे असा संदेश एसडीओ साहेब मंगरुळपिर, नगराध्यक्षा गझाला खान,गटनेते चंदुभाऊ परळीकर यांनी शहरवासीयांना दिला आहे.
No comments:
Post a Comment