कैवल्य सावंतचे यश
कसबा बावडा ता. 30
कसबा बावडा येथील श्री दत्ता बाळ प्राथमिक विद्या मंदिर मधील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कैवल्य तानाजी सावंत याने 29 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या टॅलेंट प्लस या स्पर्धा परीक्षेत 200 पैकी 186 गुण मिळवून कोल्हापूर शहरात तिसरा क्रमांक पटकावला.
तसेच समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत 200 पैकी 172 गुण मिळवून केंद्रात तिसरा क्रमांक मिळवला. त्याला संस्थेच्या अध्यक्षा सौ.पल्लवी देसाई, संस्थेचे सेक्रेटरी निलेश देसाई, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे व आई वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment