Saturday, 25 April 2020

दूध उत्पादक शेतकरी चिंतातूर - गोकुळच्या सायलेज बॅगचा पुरवठा कोरोना मुळे बंद

नंदगाव  :विजय हंचनाळे. नंदगाव ( ता - करवीर ) व परिसरातील  ग्रामीण भागामध्ये भातपिक घेण्यासाठी   शेत जमिनीची मशागतींच्या कामची सुरवात झाली आहे .बहूतांश शेतकऱ्यांनी ऊस पिकांतून किंवा  रिकाम्या शेतामंध्ये  मका , बाजरी ,कडवळ तसेच  शाळू हे जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी   उपयुक्त असे पिक घेतले आहे . भरपूर शेतकऱ्यांनी भात पिक मशागत करण्यासाठी शेतातील हे    मका , कडवळ, शाळू कापून ठेवले आहे पावसाळ्यात  जनावरांना वैरणीचा तुटवडा जाणवूने म्हणून सायलेज (  मूरघास ) बॅग भरून ठेवल्या जातात . गोकूळ दूध संघाकडून वैरण विकास विभागातर्फ अनुदानावर सायलेज बॅग दूध उत्पादक सभासदांना पुरविल्या जातात . पण कोरोना संसर्गजन्य रोगामुळे सर्वच जनजिवन विस्कळीत झाले आहे . त्यामुळे सायलेज बॅगची मागणी मोठ्या प्रमाणावर असून ही वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे सायलेज बॅगचा पुरवठा होत नाही आहे त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे . तरी गोकूळ वैरण विकास विभागामार्फत लवकरात लवकर सायलेज बॅगचा पुरवठा व्हावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे .

No comments:

Post a Comment