Thursday, 23 April 2020

कंदलगाव येथे जलसंपत्ती दिन साजरा :समाज वेध दक्षता समितीने जपला वसुंधरेचा वारसा ...

कंदलगाव - प्रकाश पाटील .
       मानवी जीवनात पाण्याला अत्यंत महत्व आहे . म्हणून प्राचिन काळापासून पाणवठे असलेल्या ठिकाणी मानवी वस्ती वसलेली आहे . म्हणूनच पाणी म्हणजे जीवन असे म्हटले आहे .
      दैनंदन जीवनात पाण्याचा वापर सध्या वाढला असून गावातील पाणवठ्यांची पातळी अतिवापरामुळे खालावत आहे . पाणी कसे वापरावे याबाबत प्रशासना कडून जनजागृती होत असूनही याचे गांभीर्य कुणालाच नाही . 
       आज दि .२४ जागतिक जल संपत्ती दिनानिमित्त कंदलगाव येथील समाजवेध दक्षता समितीच्या वतीने गावातील वाडीचा आड येथे पाणथळाची पूजा करून पाणी बचत करणेबाबत शपथ घेण्यात आली . यावेळी पाण्याचे अनन्यसाधारण महत्व सांगून पाणी कसे जतन करावे याबाबत माहिती देण्यात आली .
   पाणी जतन करणेची माहिती पुढील प्रमाणे -
१ ) पाण्याचा काटकरीने वापर करा .
२ ) पाणी आडवा , पाणी जिरवा .
३ ) रेन वॉटर हार्वेस्टींग .
४ ) शेततळी ,
५ ) झाडे लावा , झाडे जगवा . 
    या कार्यक्रमासाठी  समितीचे अध्यक्ष -सचिन संकपाळ , विलास कांबळे , संतोष निर्मळ , दक्षता समिती संस्थापक -अशोक पुंदिकर 
फोटो - जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्त पाणथळांची पुजा करताना समाज वेध दक्षता समितीचे सदस्य ..

No comments:

Post a Comment