Saturday, 25 April 2020

दक्षिणेतील पाणीप्रश्न सुटणार तरी कधी ...?? गळतीमधून मात्र लाखो लिटर पाणी वाया ..

कंदलगाव / प्रकाश पाटील 
     डिसेंबर सुरू होताच प्रत्येक घरातून सायकल अथवा  दु चाकीवर चार घागरी बांधून  गावापासून  एक - दोन कि.मी. वर जिथे भेटेल तेथून घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी होणारी कसरत गेल्या अनेक वर्षापासून या मतदार संघातील उपनगर व ग्रामिण भागात पहायला मिळते . 
     निवडणूकीच्या वेळी उमेदवारांकडून मिळणाऱ्या भरघोस आश्वासनावर मोठी आशा ठेवून आज अखेर हा मतदार संघ पाण्यासाठी तहानलेला आहे . कधी पाण्याचे टँकर तर कधी कुपनलिका खोदून थोड्या फार प्रमाणात लोकप्रतिनिधी कडून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला . मात्र हा प्रयत्न तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याने पुन्हा ये रे माझ्या मागच्या या म्हणी प्रमाणे पाण्यासाठीची वणवण सुरूच असते . 
     गेल्या वीस - पंचवीस वर्षापासून पाचगाव जि.प. मतदार संघातील सर्वच गावांचा विचार केला तर प्रत्येक गावात सुमारे पंचवीस टक्के रहिवाशी कॉलण्यामध्ये वाढ झाली असून या गावांना होणारा पाणी पूरवठा पूर्वी प्रमाणेच आहे . प्रत्येक निवडणूकीत मुबलक पाण्याचे आश्वासन देवून निवडणूक झाल्यावर दुर्लक्ष करणारे नेते या वर्षी तरी पाण्याचा प्रश्न निकालात काढणार का ? असा प्रश्न मतदारातून उपस्थित केला जात आहे . 
     पाचगाव , मोरेवाडी तसेच आर .के. नगर परिसरात स्वतःच्या पाणी पूरवठा विहिरी नसल्याने महापालिका व प्राधिकरण च्या भरवशावर अवलंबून राहावे लागत असल्याने त्यांच्या मनमानी वेळेनुसार अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्यावर तहान भागवावी लागते . आर .के. नगर , शेंडापार्क तसेच शांतीनिकेतन परिसरात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागून रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे . या गळतीकडे संबधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे . 
    कंदलगाव व कळंबा  या गावच्या हद्धीत तलाव असूनही  एप्रिल ते जूनचा पाऊस पडे पर्यत पाण्यासाठी वणवण करावी लागते . प्रत्येक वर्षी पाण्यासाठी नागरीकांची होणारी कसरत थांबविण्यासाठी  लोकप्रतिनिधींनी योग्य उपाय योजना करणे गरजेच्या आहेत . अन्यथा दक्षिणेतील पाणी प्रश्न कठिण होत जाणार ठरणार यात शंकाच नाही . .
     गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरीकांसह महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण अत्यंत बिकट असून महिलांना पाण्यासाठी सर्व दिवस खर्ची घालावा लागत आहे .
    " आ . सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून गांधीनगर प्राधिकरण योजनेतून सुधारीत आराखड्या नुसार नविन योजना मंजूर झाली असून या वर्षी काम सुरू होऊन पुढे पाणी पडणार असे काम होईल . नविन योजना लवकरच पूर्ण होईल .
संग्राम पाटील सरपंच पाचगाव .
रामदास मोरे सरपंच मोरेवाडी .

फोटो  - शेंडापार्क येथील पाण्याची गळती 
( छायाचित्र _ रोहन पाटील )

No comments:

Post a Comment