कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करण्यात सक्रिय असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांनी यात अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. . कोरोनाच्या लढ्यात योगदान देण्यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी ऑनलाईन ट्रेनिंग घेतले असून याबाबत सर्टीफिकेट मिळाले आहे. या ट्रेनिंगमध्ये कोरोनाविरुध्द लढ्यासाठी नवीन गोष्टी आ.पाटील यांनी आत्मसात केल्या आहेत.
आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाच्या या लढ्यात सक्रिय राहत काम केले आहे. पोलिसांना 2 हजार एन95 मास्क, कोल्हापूर दक्षिण मधीन रेशन कार्ड नसणाऱ्या 10 हजार कुटुंबांना धान्य वाटप, खाजगी डॉक्टरना 1 हजार पीपीई किट वाटप, कम्युनिटी क्लिनिक मधील डॉक्टरना पीपीई किट, व्हाईट आर्मी साठी सॅनिटायझर चेंबर , पीपीई किट तसेच धान्य याबरोबरच कसबा बावडा येथे 30 हजार मास्क आणि 10 हजार सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप , मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना मास्क आणि सॅनिटायझर , तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यापुढे जात या विषाणूबद्दल योग्य माहिती घेऊन लोकांना सजग करण्यासाठी आमदार पाटील यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ कार्यकारी नियोजनाची मार्गदर्शक तत्त्वे आणि कोविड-१९ विरोधी लढा देण्यासाठी देशाची तयारी, या मुद्द्यांवर प्रशिक्षण कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमात एखाद्या साथीला सामोरं जाताना लोकांचा प्रतिसाद कसा असला पाहिजे, याची आठ अंगांनी माहिती देण्यात आली. यामध्ये कोरोना संसर्ग रोखणे ,कोरोना रुग्ण उपचार व्यवस्थापन, देशपातळीरील व्यवस्थापन, कोरोनाबदल जनजागरण, विविध तक्रारीना तात्काळ प्रतिसाद, कोरोना तपासणी यंत्रणा आदी बाबींचा समावेश होता.
या प्रशिक्षणाबद्दल आ.पाटील म्हणाले, सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडूनही अनेक।मार्गदर्शक सूचना केल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या या प्रशिक्षणात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. फक्त कोरोनाच्या साथीपुरतंच नाही, तर इतर आपत्तीवेळी या प्रशिक्षनात शिकलेल्या गोष्टीं उपयुक्त आहेत. कोरोनासारख्या संकताचा सामना करण्यासाठी देश, राज्य, शहर, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर काय काय करायला हवे याचं मार्गदर्शन मिळाल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.