प्रतिनिधी - दिपक गुरव
कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजलेला आहे. लोकांनी सुरक्षित रहावे याकरिता संपूर्ण प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. याचाच एक भाग असलेले कर्मचारी म्हणजे आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक शाळांचे शिक्षक व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व तलाठी कार्यालयातील कर्मचारी या सर्वांचा थेट संपर्क नागरिकांशी रोजच्या रोज येत आहे. दररोजचा सर्व्हे, आरोग्य तपासणी, गावा मध्ये नवीन व्यक्ती आलेस त्याची संपूर्ण माहिती घेणे व त्याची तपासणी करणे, संपूर्ण गावात औषध फवारणी करणे अशी वेगवेगळी कामे हे सर्व कर्मचारी करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थी पणे काम करणारे हे खरे योद्धे आहेत.
या सर्व कर्मचाऱ्यांचे या कालावधीमध्ये आरोग्य उत्तम राहणे ही गरजेची बाब आहे. त्यांचे कोणत्याही संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण व्हावे याकरिता त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढणे आवश्यक आहे. म्हणूनच गडमुडशिंगी येथील डॉक्टर शरद शिंदे यांनी "अर्सेनिकम अल्बम 30" या होमिओपॅथी औषधाचे मोफत वाटप गावात काम करणार्या या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना केले.
सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून हा उपक्रम राबविला त्या करीता डाॅ. शरद शिंदे व गावातील सर्व खाजगी प्रॅक्टीस करणार्या डाॅक्टरांनी आतापर्यंत ग्रामपंचायतला जे सहकार्य केले आहे त्या बद्दल सरपंच तानाजी पाटील यांनी सर्वांचे आभार मानले
या कार्यक्रमास गडमुडशिंगी चे तानाजी पाटील, प्रा. आ. केंद्राच्या आरोग्य सेविका संध्या महाजन, कृषी सहाय्यक स्मिता नावलगी, गितेश डकरे, शिवाजी मगदूम, दिपक गुरव, तेजस्विनी शिंदे, दिपाली माळी व सर्व आशासेविका, नंदा गवळी व अंगणवाडी सेविका , मदतनीस, प्राथमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते ....
"सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या त्यांच्या घरची जबाबदारी आहे. सर्वांचे आरोग्य चांगले रहावे व ते सुरक्षित रहावेत म्हणून हा प्रयत्न, या पुढे गावातील सर्व नागरिकांना हे औषध वाटण्याचा संकल्प आहे" ..... डाॅ. शरद शिंदे.
No comments:
Post a Comment