हेरले / प्रतिनिधी
अमर थोरवत
हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राने केद्रातंर्गत येणाऱ्या सहा गावातील १० हजार ६ कुटुंबाचे सर्वेक्षण करून ४३ हजार २९० लोकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली.
कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हेरले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या हेरले,रूकडी, अतिग्रे, चोकाक, माले, मुडशिंगी आदी सहा गावातील सहा उपकेंद्राच्या माध्यमातून ३२ आरोग्य कर्मचारी, ४६ आशा स्वयंमसेविका, ४३ शिक्षक आदीसह १८१ च्या टिमद्वारे १० हजार ६ कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण करून ४३ हजार २९० लोकांचे ताप, खोकला व श्वसनाचा त्रास आदी आरोग्याच्या तक्रारीची तपासणी करण्यात आली.
हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत मार्चपासून ७१५ जणांचे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी रुकडी २७७, हेरले १४३, अतिग्रे १३३ , चोकाक ६९, माले ४५, मुडशिंगी ४८ आदी सहा गावातील संख्या आहे. त्यापैकी ६९६ जणांचे चौदा दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे.
६५४ जणांचे २८ दिवसाचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. या पैकी रुकडी २५६, हेरले १२५, अतिग्रे १२७,
चोकाक ६४, माले ४o, मुडशिंगी ४२ आदीसह जणांचे क्वारंटाईन पूर्ण झाले आहे.१ मेपासून जिल्ह्याबाहेरील आलेल्या ३६ जणांपैकी १३ जणांचे होम क्वारंटाईन केलेले आहे. यामध्ये हेरले ७, अतिग्रे ३, चोकाक १, मुडशिंगी दोन.
उर्वरीत पंधरा संस्थामध्ये अलगीकरण करण्यात आलेले पैकी रुकडी ८, हेरले ११, चोकाक ४ अशी संख्या मिळून तीन गावातील २३ संख्या असून पंधरा संस्थापैकी सहा गावामध्येच संस्था अलगीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिध्दीस वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख यांनी दिली.
No comments:
Post a Comment