Saturday, 23 May 2020

सैनिक टाकळीमध्ये 500 कुटुंबांना अर्सेनिक अल्बम चे मोफत वाटप

सैनिक टाकळी प्रतिनिधी
येथील डॉक्टर संजय पाटील व डॉक्टर अनिता पाटील या दाम्पत्याने सैनिक टाकळी येथील नागरिकांना कोरोना  पासून बचाव व्हावा यासाठी भारतीय आयुष्य मंत्रालयाने शिफारस केलेली आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथी  औषधाचे मोफत  वाटप  पाचशे कुटुंबांना केले . डॉ. पाटील यांनी  या औषधाचे वाटप  सरपंच हर्षदा पाटील उपसरपंच सुदर्शन भोसले यांच्या उपस्थितीत केले ..भारतीय आयुष मंत्रालयाने एका निवेदनात  होमिओपॅथीच्या संदर्भात कोरोनव्हायरस रोखण्यासाठी लोकांनी काय पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली आहे.  आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी,  होमिओपॅथी याद्वारे  रोग प्रतिकारशक्ती  वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. डॉक्टर कुटुंबीयांनी कलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते

No comments:

Post a Comment