उदगीर प्रतिनिधी - गणेश मुंडे
लातूर जिल्ह्यात वन क्षेत्राचे प्रमाण ख कमी असल्याने हे वाढविण्यासाठी वृक्षलागवड ही लोक चळवळ व्हावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावे पुढील काळात हरित उदगीर,व हरित जळकोट ही संकल्पना राबविली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा,पर्यावरण राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर,जळकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये 5 जुन,पर्यावरण दिन रोजी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे या बाबत आढावा घेण्यात आला.या बैठकील मछिद्रं गायकर विभागीय वन अधिकारी उस्मानाबाद, प्रियंका गंगावणे सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी,उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, रोहयो चे उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी,उदगीर चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तहसीलदार जळकोट संदीप कुलकर्णी, न. प. मुख्याधिकारी उदगीर भरत राठोड,उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदगीर अंकुश चव्हाण,जळकोट गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्या सह उदगीर जळकोट मतदान संघातील बसवराज पाटील नागराळकर ( प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस),राजेश्वरजी निटुरे ( माजी नगराध्यक्ष उदगीर), प्रा. शिवाजीराव मुळे (ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर ),मन्मथ अप्पा किडे ( ता. अध्यक्ष कॉंग्रेस जळकोट ), अर्जुन मामा आगलावे ( ता.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जळकोट ), सिध्देश्वरजी पाटील(सभापती कृ. उ. बा. स. उदगीर )शिवाजी अण्णा केंद्रे, कल्याणजी पाटील(ता.अध्यक्ष कॉंग्रेस उदगीर ),चंदन पाटील नागराळकर ( युवक जि.अ.राष्ट्रवादी काँग्रेस लातुर )बाबुराव जाधव,बालाजी ताकबीडे(सभापती पं. स. जळकोट ),संतोष तिडके(जि. प. गटनेते )बापुराव राठोड,समीर शेख उपस्थित होते
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष लागवडीचे जे उदीष्ट आहे त्याप्रमाणे नियोजन करण्यात यावे सामाजिक वनीकरण विभागाने 30 जुन 2011 चा शासन निर्णय नुसार राज्यात वृक्षलागवडीचा बिहार पँटर्न राबवावा पर्यावरण दिनानिमित्त उदगीर,जळकोट या तालुक्यात लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपासाठी दोन्ही तालुक्यातील उपविभागीय अधिकारी याच्या अघ्यक्षेतेखाली सामिती स्थापण करण्यात येणार आहे.ही समिती तालुक्यातील प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत याच्याशी समन्वय साधेल प्रत्येक ग्रामपंचायतीस झाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच मागील काही वर्षाचा अनुभव पाहाता काही सेवाभावी संस्था पाच जुन रोजी वृक्ष लागवड करत असतात या संस्था मार्फत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीचा आढावा घेऊन ज्या संस्था या वृक्ष लागवड व संगोपन पुढील तीन वर्षे यशस्वी करतील त्या संस्था पैकी प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या संस्थास अनुक्रमे 11लाख, 5 लाख व ,3 लाख बक्षिसे देण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
No comments:
Post a Comment