दोंडाईचा - (प्रतिनिधी वैभव करवंदकर) दोंडाईचा येथील चुनिलाल शंकर मेटकर यांचे जेष्ठ पुत्र दिनेश व चोपडा येथील अनिल बाबुराव शिंपी यांची जेष्ठ कन्या दिपाली यांचा शुभविवाह सोहळा झाला. कोरोना विषाणूचा संसर्गचा काळात तसेच केंद्र सरकार राज्य शासनाने लाॅकडाऊन केल्यामुळे लग्न सोहळा मोठ्या स्वरूपात न घेण्याचे आदेश असल्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न करता रामी शिवारातील महादेवाचा मंदिरात साध्या पद्धतीने त्यांचे कौटुंबिक व मुलीकडील दोंन व्यक्ती यांच्या साक्षिणी विवाह संपन्न झाला होता. त्या नव दाम्पत्याला अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज , मंध्यवंर्ती संस्थे तर्फे दिल्या जाणारे रेशीमबंध प्रमाणपत्र व नव दाम्पत्यास शपथ आज दिनांक २६ मे २०२० रोजी अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज , मंध्यवंर्ती संस्थेचे नामविश्व चे सहसंपादक प्रा प्रकाश भांडारकर धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग शिंपी दोंडाईचा शिंपी समाज अध्यक्ष हरिदास जगताप , उपाध्यक्ष मनोज मेटकर , म.का.सदस्य सुरेश बागुल , कन्हैयालाल जगदाळे , नामविश्व प्रतिनिधी युवा अध्यक्ष सतिश जाधव , नवयुवक मंडळाचे उपाध्यक्ष विशाल मेटकर , सचिव सागर पवार , योगेश बोरसे यांच्या उपस्थितीत वरवधू यांना अखिल भारतीय श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज , मंध्यवंर्ती संस्थेच्या तर्फे रेशिमबंध प्रमाणपत्र देऊन शपथविधी दिला गेला.
No comments:
Post a Comment