नंदुरबार - जन शिक्षण संस्थान नंदुरबार 1 मधील प्रशिक्षिका सौ.दुर्गा राजू गावीत परीवाराचा संकल्प नवापुर तालुक्यातील सावरट जवळील वनवासी भागात कोरोना विषाणू विषयी माग॔दश॔न करून त्यांना मास्क निशुल्क वाटप करून शारीरीक अंतर ठेवून मास्क वापरामुळे कोरोना व्हायरच पासुन स्वतःचे रक्षण कसे करावे हे मागॆदश॔न करण्याचे काम करीत आहेत. तसेच दिवसभर गावीत यांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्ती कापडाचे मास्क शिवण्याचे काम करत आहे. प्रत्येक गावात पाड्यात संपक॔ करून गावातील महिला पुरूष मदत घेवुन प्रत्येक घराघरात मास्क वाटप करीत आहेत . जन शिक्षण संस्थान नंदुरबार 1 चे काय॔क्रम अधिकारी. शामकुमार चौधरी ,सहाय्यक काय॔क्रम अधिकारी सुनिल सोनवणे हे व्यक्तीगत स्तरावर संपक॔ करून दात्या कडून कापडं उपलब्ध करून 20 हजार लोकांना मास्क वाटप करण्याचा संकल्प जन शिक्षण संस्थान 1 माफ॔त करण्यात येत आहे.
आदिवासी पाड्यात कोरोना जागृती
मा. पंतप्रधान याच्या आवाहनाला प्रतिसाद देत जन शिक्षण संस्थान १ नंदुरबार च्या माध्यमातून मास्क निर्मिती व वाटप हा उपक्रम कोळदे ता. नवापूर येथे राबवण्यात आला. जे.एस.एस. च्या शिवण कला प्रशिक्षिका सौ. दुर्गा राजू गावित यांनी पाड्यात जाऊन कोरोना विषाणू बद्दल माहिती देऊन मास्क चे मोफत वाटप केले . या कामी त्यांचे पूर्ण कुटुंब सहकार्य करीत आहे. जे.एस.एस. चे कार्यक्रम अधिकारी श्याम राजपूत व सहायक कार्यक्रम अधिकारी सुनिल सोनवणे त्यांना मार्गदर्शन करीत आहे.
No comments:
Post a Comment