रस्त्यात सापडलेली रोख रक्कम व कागदपत्रे परत केलेबद्दल अवनीश सोनवणकरचे कौतूक ..
प्रतिनिधी - प्रकाश पाटील ,
केएमटी कॉलनी पाचगाव, नेहमीप्रमाणे सकाळी अवनीश अमोल सोनवणकर (वय-११) हा बाबांबरोबर फिरायला बाहेर पडला. यावेळी त्याला रस्त्यात त्याला पैशाचे पाकीट सापडले. यात रोख रक्कम २५००, महत्वाची कागदपत्रे होती.या वेेळी अनेक वाहने येथून गेल्या मुळे या बापलेकांना हे पाकीट कोणाचेे आहे हे समजू शकले नाही. पाकिटा मधिल कार्डवरून त्यानी मालकाशी संपर्क साधला पण अपयश आले .
छोट्या अवनीशला मात्र चैन पडेना. ते काका आता काय करतील म्हणून बाबांबरोबर लांबवर शोधूनआला .पण शोध लागला नाहींच .शेवटीं कसाबसा फेसबुक संपर्क होऊन युवराज तिवले रा .कळंबा यांचे ते पाकीट असल्याचे समजले . त्यांची भेट घेऊन त्यांना रोख रक्कम व कागदपत्रे परत दिल्यावरच त्याला बरे वाटले .छोट्या अवनीश च्या प्रामाणिकपणा बद्दल तिवले यांनी कौतुक करुन अवनीश ला प्रामाणिक पणा बद्दल पाचशे रुपये बक्षीस म्हणून दिले . अवनीशने हे बक्षीस मिळालेले पैसे कोरणा ग्रस्तांसाठी मदत केले आहेत ..
फोटो - कंदलगाव - कळंबा येेथील युवराज तिवले यांना रोख रक्कम व कागदपत्रे देताना अवनीश सोनवणकर .
No comments:
Post a Comment