Saturday, 30 May 2020

गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील लघुउद्योग सुरू करा; शिवसेनेचे निवेदन


गांधीनगर प्रतिनिधी,
एस एम वाघमोडे
गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील लघु उद्योग अजूनही बंद असल्यामुळे या उद्योगावर अवलंबून असणारे असंख्य कामगार घरीच बसून असून त्यामुळे अशा कामगारांचे आर्थिक व सामाजिक परिस्थिती बिकट बनत चालले असून यासाठी गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग सुरू करून या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांच्या हाताला रोजगार द्यावा असे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत पोतनीस यांना देण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या अटींच्या धास्तीने बंद असणाऱ्या उद्योगांचे योग्य समुपदेशन करून अशा उद्योजकांना आपले उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यात व देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापासून एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद होते परंतु सरकारने कोरोना संसर्ग रोखण्याच्या काही मार्गदर्शक सूचना देऊन उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख विनोद खोत, शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान कदम, दयानंद शिंदे, सुरेश पाटील, रवींद्र जाधव ,शांताराम पाटील ,अभिजीत पाटील, बबलू शेख ,सुशांत देसाई, मानसिंग मगर व काका खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो 
गोकुळ शिरगाव करवीर शिवसेनेच्यावतीने लघुउद्योग सुरू करण्यासंबंधी निवेदन गोशिमा ला देण्यात आले.

No comments:

Post a Comment