भाजीपाला लागवड शेतकरी आर्थिक संकटात ..!
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर तालुक्यातील वंजारवाडी हे गाव तोंडार ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येथे हे गाव अगदी डोंगराच्या पायथ्याशी बसलेले आहे आज ही या वाड्याच्या म्हणावे तसा विकास होत नाही येथील शेतकरी रामदास मुंडे यांनी आपल्या शेतात दिड एकर वांगी लागवड केली आहे दिड एकर वांगी असल्याने फळ ही मोठ्या प्रमाणात लागत आहे परंतु लाॅकडाऊन वाढत असल्याने वांगी तोडण्यासाठी मजुर ही येत नाही व तोडलेल्या वांगी ला मार्केटिंग पण होत नाही. तर कोरोनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.कोरोना व्हायरस महाराष्ट्रात दिवसेन दिवस डोके वर काढत आहे. उदगीर तालुक्यात ही त्याचा शिरकाव झालेला आहे.तर कोरोनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. वांगी लागवडीचा ओषध फवारणी चा एकरी खर्च ही मोठ्या प्रमाणात आहे तो खर्च पण निघत नसल्याने आर्थिक संकटात आणखी भर पडली आहे
तर राज्यात लाँकडाऊन असल्याने सध्या भाजीपालाल्या योग्य भाव मिळत नसल्याने हजारो रुपयांचा माल शेतामध्ये खराब होत असल्याने शेतकरी अंत्यत चिंतेत आहेत.तोडलेली वांगे ही दररोज शेतातील जनावरांना टाकावे लागत आहे तरी प्रशासनाने भाजीपाला लागवड शेतकरी यांच्या कडे लक्ष घालावे असी मागणी होत आहे.
.................प्रतिक्रिया..........
या संदर्भात रामदास मुंडे शेतकरी यांना विचारणा केली असता दिड एकर वांगी लागवड केली असुन या लागवडीचा व ओषध फवारणीचा पण खर्च निघत नाही व तोडणीला मजुर पण येत नाहीत अस्या दुहेरी संकटात सापडलो आहे असे ही ते बोलताना म्हणाले.