Friday, 29 May 2020

१५ जुनला शाळा सुरू करण्यास शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध

.
हातकणंगले / प्रतिनिधी
मिलींद बारवडे
   कोरोना बाधितांची  संख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हयात वाढत असल्याने, सद्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने जिल्हा प्रशासनाने बहुतांशी शाळा व महाविद्यालये , विविध वस्तीगृहे, निवासी शाळांची वस्तीगृहे, आश्रमशाळा विलगीकरणासाठी ताब्यात घेतल्याने तसेच जिल्हा बंदीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक अडकून पडल्याने व अनेक पालकांनी मुळ गावी स्थलातंर केल्याने आणि पालकांच्या मनामध्ये कोरोना बाबत प्रचंड भिती असल्याने व शालेय वयोगट लक्षात घेता १५ जुनपासून महाराष्ट्रात शाळा सुरू करणे हे संयुक्तीक ठरणार नाही. म्हणून याला शैक्षणिक व्यासपीठाचा तीव्र विरोध करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मुख्याध्यापक संघाच्या  विद्याभवन सभागृहात झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष एस.डी. लाड होते.
    १५ जुनपासून शाळा सुरू करण्याबाबत शासकिय स्तरावरून शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी शासन चर्चा करत आहे. म्हणून जिल्हा व्यासपीठाचे मत शासनाला कळीवण्यासाठी आजच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी १५ जुनपासून शाळा सुरू केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणी विषयी स्पष्ट मते मांडली. प्रत्येक शाळेत आरोग्य व्यवस्थेचा खर्च कोण उचलणार, विदयार्थ्यांमधील सामाजिक अंतर राखणे किती अवघड आहे, विद्यार्थ्यांची वाहतुक सुविधा, कोरोना सेवेसाठी नेमण्यात आले ल्या शिक्षकांना अर्जित रजा मंजूर कराव्यात, ऑनलाईन शिक्षण देण्यास येणाऱ्या समस्या, चालू वर्षी संच मान्यता करू नये व कोणत्याही शिक्षकास अतिरिक्त ठरवू नये, टप्पा अनुदानावरील सर्व शाळांना पुढील टप्पा अनुदान ताबोडतोब मिळावे , मुल्याकंन पुर्ण केलेल्या सर्व प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व सन १२-१३च्या वर्ग तुकड्यांना वेतन अनुदान सुरू करावे, आयसीटी तज्ञ शिक्षक यांना सेवेत घेऊन त्यांचे वेतन सुरू करावे या विषयांवर सर्वकंश चर्चा करण्यात आली.
       १५ जुनपासून शाळा सुरू होण्यास विरोध असला तरी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयक्रम पुस्तकांचे वितरण व्हावे, १५ जुनपासून शैक्षणिक सत्र सुरू करून शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांना उपस्थित राहण्यास परवाणगी दयावी. 
   या सभेस अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, प्रा. जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड,शिवाजी माळकर,  भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, प्रभाकर हेरवाडे, सुधाकर निर्मळे, व्ही जी पोवार,  बाबासाहेब पाटील, संतोष आयरे ,बी जी बोराडे,  सी एम गायकवाड, डी एस घुगरे,  के के पाटील, उदय पाटील, शिवाजी कोरवी, विजय पाटील, काकासाहेब भोकरे, राजेंद्र कोरे ,पंडीत पवार,    मिलींद बारवडे, आर वाय पाटील ,एस एस चव्हाण, जगदिश शिर्के ,अशोक हुबळे, संदिप पाटील, नंदकुमार गाडेकर, इरफान अन्सारी,  मोहन आवळे प्रा. समीर घोरपडे, प्रकाश सुतार  आदी पदाधिकारी उपस्थित होते.
        फोटो 
शैक्षणिक व्यासपीठाच्या बैठकीत चर्चा करीत असतांना अध्यक्ष एस.डी. लाड, दादासाहेब लाड, जयंत आसगावकर सुरेश संकपाळ दत्ता पाटील व इतर मान्यवर.

No comments:

Post a Comment