टेंभुर्णी प्रतिनिधी : महाराष्ट्रामध्ये योग आणि निसर्गोपचार तज्ञांवर बोगस डॉक्टर म्हणून बऱ्याच डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. योग आणि निसर्गोपचार प्रशिक्षण घेतलेल्यांना निसर्गोपचार तज्ञ म्हणून व्यवसाय करता येतो त्यामुळे त्यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून होणारी कारवाई चुकीचा आहे. योग आणि निसर्गोपचार प्रशिक्षण घेतलेले व्यावसायिक त्यांना मिळालेल्या शिक्षणाप्रमाणे व्यवसाय करत असतात. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणीच्या वेळी वैद्यकीय अहर्ता आणि कौन्सिलबाबत विचारणा करण्यात येते. ते पूर्णपणे चुकीची आहे. वैद्यकीय अधिनियमाप्रमाणे योग आणि निसर्गोपचार व्यवसाय करत नाहीत. त्यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून होणारी कारवाई चुकीची असून ती रोखण्यात यावी म्हणून मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना लाॅकडाऊन संपल्यानंतर भेटून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहे. निवेदन देऊन जर न्याय नाही मिळाला तर सुप्रीम कोर्टात जाणार आहे असे आयुष भारत च्या प्रदेश अध्यक्ष डॉ.शाहीन मुलाणी पत्रकारांशी बोलताना सांगितले .
No comments:
Post a Comment