सैनिक टाकळी प्रतिनिधी
सैनिक टाकळी येथील कुमार विद्या मंदिर प्रांगणात बहावा झाड बहरला फुलांनी
निसर्गाने धरतीवर सुंदर प्रकारच्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. या मध्ये विविध प्रकारच्या फुले ,फळे ,यांचा समावेश होतो. प्रत्येक ऋतू नुसार निसर्गाचे चक्र फिरत असते.श्रावणात जसा निसर्ग हिरवा शालू नेसतो. तसेच चैत्राचे आगमन होताच निसर्गात अनेक रंग बेरंगी फुले फुलायला सुरुवात होतात . यामध्ये अनेक अशी फुले आहेत की त्या फूलाने संपूर्ण झाडच
बहरते. या मधील एका प्रकारच्या झाडाचे नाव म्हणजे बहावा . पिवळसर फुलांनी भरगच्च भरलेले झाड पाहणे म्हणजेच . निसर्गनिर्मित एक अद्वितीय बाब . झुबंर लटकल्या सारखे फुलांचे गुच्छ या झाडास लटकताना दिसतात येथील कुमार विद्यामंदिर च्या परिसरात असणाऱ्या या बहावा झाडास फुलांचा बहर आला . रात्री या फुलांचा सुगंध परिसरामध्ये दरवळत आहे . हे झाड पिवळा शालू असल्यासारखे दिसत आहे.
No comments:
Post a Comment