Sunday, 3 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सलाम - डॉ. श्रेयस जुवेकर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सलाम - डॉ. श्रेयस जुवेकर 
सिद्धनेर्ली - प्रतिनिधी 
कोरोणा सारख्या संसर्गजन्य परीस्थितीत देशावर आलेल्या आपत्कालीन परीस्थितीत ज्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्यांना सलामच करावा लागेल असे भावनिक उदगार कागल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर यांनी केले ते सिद्धनेर्ली येथे आयोजित रक्तदान शिबीराच्या उद्धघाटन प्रसंगी संयोजकांशी बोलत होते.याप्रसंगी सिद्धनेर्लीच्या सरपंच  अरूणा सुदाम पाटील या उपस्थित होत्या. 

        १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून प्रांजल फाउंडेशन, माई फाउंडेशन, यशस्वीनी महिला मंच, दहावी 1993 वर्गमित्र, दि सिद्धनेर्ली क्रेडिट सोसायटी, तसेच ग्रामपंचायत सिद्धनेर्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 
          यावेळी गावातील १०६ युवकांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला .उन्हाळ्यात होणारी रक्ताची कमतरता व मागणी जास्त असल्यामुळे दरवर्षी 1 मे रोजी रक्तदान घेतले जाते .या वर्षी रक्तदानाचे हे तिसरे वर्ष आहे. 
कोराणा विषाणू संसर्गामुळे देशांमध्ये हाहाकार माजला आहे, त्यामुळे राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, तसेच कागल पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. 
कोरोणा विषाणू बाबत दिलेल्या सर्व अटी व खबरदारी घेऊन शिबिर यशस्वीपणे पार पडले.       
        यावेळी पंचायत समिती सदस्या मा. पुनम महाडिक, सिध्दनेर्लीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर बुगडे , गाव कामगार तलाठी विनायक पोवार, ग्रामपंचायत सदस्य किरण मगदूम, राजू घराळ,रणजित पाटील, आरोग्य सेवक अनिल जाधव, नयन सिस्टर,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, वैभवलक्ष्मी ब्लड बॅकेचे डॉ सागर माळी, यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक तसेच फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते 1993 चे सर्व माजी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

फोटो- रक्तदान करताना गावकामगार तलाठी मा. विनायक पोवार, उपस्थित  बळीसाहेब मगदूम, डॉ श्रेयस जुवेकर, डॉ, बुगडे , सरपंच. अरूणा सुदाम पाटील, कॉ शिवाजी मगदूम, सुधीर पाटील

No comments:

Post a Comment