एकोंडी येथे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, तसेच आरोग्य कर्मचार्यांना सुरक्षाकीट वाटप
प्रतिनिधी - एकोंडी ता. कागल येथे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, तसेच आरोग्य कर्मचार्यांना कुंभार गल्ली तरूण मंडळाच्या वतीने सेनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, सेनकोट आदी सुरक्षाकीट देऊन गौरविण्यात आले.
कोरोना व्हायरस या महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाला सध्या वेठीस धरले आहे . अशा परिस्थितीत आशा, गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी हे स्वतःचा जीव धोक्यात घालून भर उन्हात सर्व्हे करून संपूर्ण नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कष्ट करीत आहेत त्यांच्या या कष्टाला सलाम करून एकोंडी येथील कुंभार गल्ली तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतिने त्यांना सुरक्षाकीट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ . शिंदे मॅडम, कोंडेकर , शारदा कुंभार, सिंधुताई चौगुले, लता पाटोळे, सुषमा बोभाटे, जयश्री कुंभार, सुनिता परीट, उज्वला पाटील, भारती पाटील, यांच्यासह कुंभार गल्ली तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - एकोंडी येथे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी, तसेच आरोग्य कर्मचार्यांना सुरक्षाकीट वाटप करण्यात आले