गांधीनगर : एस एम वाघमोडे
पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठेतील सर्व दुकाने सोमवार (या. 11) पासून ग्राहकांच्या सेवेसाठी खुली राहणार आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत दुकाने सुरू राहतील. व्यापारी संघटना व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बाजारपेठेचे आर्थिक चक्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
दुकाने खुली करण्यासाठी ज्या अटी व नियम घालून दिलेले आहेत ते व्यापाऱ्यांनी तंतोतंत पाळण्याचे आहेत. सोशल डिस्टन्स, सनीटायझर, मास्क, हँडवॉश आदींचा वापर ग्राहक, दुकानदार व कामगारांनी करणे अनिवार्य आहे. जेणेकरून गर्दी होणार नाही याची दक्षताही संबंधित घटकांनी घ्यावयाची आहे, अशा सूचना गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिली. या बैठकीस होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश उर्फ पप्पू अहुजा, अशोक तेहलियानी, रिटेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कुकरेजा, सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष भजनलाल डेंबडा व असोसिएशनचे सदस्य व व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.