नंदुरबार (प्रतिनिधी वैभव करवंदकर) ------ महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वत्र कोरोना चा फैलाव झपाट्याने होत आहे व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी, दलित, मोलमजूर, सगळेच संकटात सापडले आहेत सरकारकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही पोलीस व डॉक्टरांवर देखील हल्ले होत आहे केंद्रातील श्री मोदी सरकार व्यापक स्वरूपात मदत करीत असताना राज्य सरकार कडून कुठल्याही प्रकारची मदत जनतेला केली जात नसल्याने जनता अडचणीत आहे भारतीय जनता पार्टीने या निष्क्रिय सरकार विरोधात महाराष्ट्र बचावाची हाक दिली आहे त्या अनुषंगाने दिनांक 22 मे 2020 रोजी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आपल्या घराबाहेर आपल्या कार्यालयाबाहेर परिवारासह निषेधाचे फलक हातात घेऊन काळ्या फिती लावून आंदोलन करायचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक, जि प सदस्य, विविध आघाडी मोर्चाचे अध्यक्ष व पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते यांनी सकाळी 10 च्या सुमारास वरील प्रमाणे आंदोलन करावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment